शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

घोडधरणात पक्त २.८७ टक्के पाणीसाठा

By admin | Published: March 17, 2016 3:05 AM

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये शिरूर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आहे; मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे हे क्षेत्र घटत चालले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ५६३९ द. ल. घ. फू. एवढी असून, त्यापैकी २१७२ द. ल. घ.फू. मृत, तर ३४६७ द. ल. घ. फू. हा उपयुक्त पाणीसाठा मानला जातो. धरणाच्या उभारणीपासून आतापर्यंत संबंधित खात्याच्या वतीने धरणात साठलेला गाळ काढण्याची खास अशी व्यवस्था न झाल्याने धरणपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे.अलीकडच्या काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने झालेल्या पाच धरणांमुळे बरेचसे पाणी वरच अडविले जाते. त्यामुळे २००० सालानंतर हे धरण अभावानेच १०० % भरले आहे.याशिवाय धरणाच्या पाण्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखाना; तसेच रांजणगाव- कारेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखाने या पाण्यावर चालतात. हे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत व शिरूर -श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना या धरणामधून आहेत.मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे धरणामध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वडज धरणातून ५०० द . ल. घ. फू. पाणी घोडधरणात सोडण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २७० ते २८० द.ल.घ. फू. एवढेच पाणी प्रत्यक्ष धरणात पोहोचले. सध्या धरणात केवळ २.८७ टक्के म्हणजे, १४४ द.ल.घ. फू.एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. साठलेल्या गाळामुळे हा साठा कमी ठरू शकतो. त्याचप्रमाणे इनामगाव, शिरसगाव, गणेगाव या भागात असलेले पाचही बंधारे कोरडे आहेत. दि. ६ ते ११ मार्च या कालावधीत उजव्या व डाव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडले होते. (वार्ताहर)उन्हाळी आवर्तन सोडता येणे शक्य नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे सध्या या भागात असलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात असून, उन्हाळ्यात पिके पाण्याअभावी जळून जातील. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.