उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज प्रातिनिधिक पाच जणांना देणार चावी
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण २ हजार ९०८ लाभार्थ्यांना म्हाडाच्या सदनिका वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक ५ लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेत शुक्रवारी सकाळी १० वाजता कोरोनाचे निर्बंध पाळून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ऑनलाइन सोडतीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यावेळी ५ हजार ६४६ सदनिकांची सोडत त्यावेळी काढण्यात आली होती.
----
चौकट
लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सदनिकांचा तपशील
* प्रधानमंत्री आवास योजना - २०९ सदनिका
* म्हाडा गृहनिर्माण योजना - १६ सदनिका
* २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना - एकूण ७५५ (पुणे महापालिका - ३००, पिंपरी-चिंचवड महापालिका - ४५५)
* म्हाडा गृहनिर्माण योजने अंतर्गत (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) - १४९६ सदनिका
* एकूण २९०८ सदनिका