शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
3
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
4
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
5
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
6
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
7
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
8
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
9
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
10
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
11
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
12
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
14
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
15
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
16
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
17
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
18
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
19
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
20
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

बारामतीत बनावट व्यक्तीकडून खोटा दस्त करून माजी सैनिकाची ३ एकर जमीन बळकावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:50 PM

मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता ;  शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

(बारामती) सांगवी : बनावट व्यक्ती व आधार कार्ड बनवून खोट्या व्यक्तीच्या मदतीने बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर उभे करून बेकायदेशीर दस्त करून माजी सैनिकाची ३ एकर जमीनीचा परस्पर व्यवहार करून  फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहॆ.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय बारामती जि.पुणे येथे हा प्रकार घडून आला. 

याबाबत फिर्यादी महादेव विठ्ठल कुंभार, (वय ६७), व्यवसाय सेवानिवृत्त सैनिक , रा. भिगवण रोड, पंचायत समितीजवळ, साईनगर बारामती जि पुणे. यांनी आरोपी (बनावट आधार कार्ड बनवलेला ) महादेव विठठल कुंभार, रा. मदनेवस्ती पिराळे नातेपुते ता. माळशिरस जि सोलापुर ), नितीन पंढरीनाथ दांगट रा. वडगाव बु. हवेली जि पुणे),गणेश एकनाथ मगर, रा. मगरपटटा हडपसर ता. हवेली जि. पुणे), अशोक केरभाउ भोरडे मु.पो. पिंपरी सांडस ता. हवेली जि पुणे) व इतर ५ ते ६ अनोळखी इसमांनी जमीन बळकावून फसवणूक केल्या बाबत फिर्याद दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

शासनाकडून सीलिंग मधून माझी सैनिक कुंभार यांना बारामती तालुक्यातील मूर्टी येथे ३ एकर जमीन मिळाली होती. तेथील एकूण ११८ गुंठे जमीन आरोपींकडून बळकावण्यात आली आहॆ.

मूर्टी येथील त्याच शेतीच्या गटात आणखी एकाची माजी सैनिक कुंभार यांच्या प्रमाणेच फसवणूक झाल्याचे कुंभार यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली.

आरोपी यांनी संगणमत करून बनावट आधारकार्ड बनवुन सेवा निवृत्त सैनिक महादेव कुंभार असल्याचे  भासवुन त्यांची जमिन बेकायदेशिररित्या बळकावण्यासाठी मे. दुय्यम निबंधक बारामती यांच्या कार्यालयात खोटा बिगर ताबा साठेखत दस्त क्र. १४६६/२०२४, १६ फेब्रुवारी २०२४ रोजी करून मोठी  फसवणुक केली आहॆ. याबाबत आरोपींचा तपास सुरू असून अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून लवकरच हे रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Baramatiबारामती