Parvati Vidhan Sabha: पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

By अजित घस्ते | Published: October 24, 2024 04:16 PM2024-10-24T16:16:01+5:302024-10-24T16:16:39+5:30

महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने आबा बागुल यांनी पर्वतीतून काँग्रेस, महाविकास आघाडी आणि अपक्ष असे ३ उमेदवारी अर्ज भरले

3 candidature applications filed by Aba Bagul from Parvati Legislative Assembly | Parvati Vidhan Sabha: पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

Parvati Vidhan Sabha: पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात १९७८ च्या निवडणुकांपासून २०२४ पर्यंत काँग्रेस पाचवेळा आणि भाजप तीनवेळा जिंकली आहे. या सर्व लढती चुरशीच्या झाल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत येथे भाजपचे मताधिक्य कमी झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत पर्वती मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. महायुती की महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पर्वती मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ असून या ठिकाणी मुस्लिम, दलित, ओबीसी व मराठा अशा सर्व जाती-धर्माचे संमिश्र मतदान आहे. यामुळे पर्वती मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसपक्ष, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारी म्हणून गुरुवारी तीन अर्ज दाखल केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून मागच्या वर्षी मागच्या वेळी अश्विनी कदम यांनी पर्वती विधानसभा लढवली असता अवघ्या ३६ हजार ७२७ मताने पराभव झाला होता. यावेळी मात्र राष्ट्रवादीचे तिकीट कोणाला मिळणार याकडे लक्ष असून पर्वती मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होण्याचे चित्र दिसत आहे.

उमेदवार परिचय 

- १९९२ पासून पुण्याच्या राजकीय पटलावर सक्रिय.
- १९९२ ते २०२२ पर्यंत वॉर्ड असो किंवा प्रभाग त्याची रचना बदलली तरी निवडून आले.
- सलग ६ वेळा म्हणजेच ३० वर्षे नगरसेवक.
- स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, गटनेते, उपमहापौर या पदांच्या माध्यमातून शहर विकासासाठी अनेक ठराव.
- उपमहापौर पदाच्या माध्यमातून प्रथमच महापालिकेत राबविलेला 'जनता दरबार' प्रभावी.

Web Title: 3 candidature applications filed by Aba Bagul from Parvati Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.