शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
2
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
3
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
4
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
6
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
7
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
8
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
9
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
10
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
11
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
12
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
13
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
14
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
15
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
16
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
17
मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा
18
चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम
19
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
20
धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित

Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 3:02 PM

पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

पुणे: सलग तीन दिवस सायंकाळी पुण्यात पावसाची हजेरी लागली असून, पुढील दोन दिवस पावसाचे असणार आहेत, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरातही पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण असमान आहे. बहुतांशी भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने सोमवारी (दि. १९) राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला, तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुधवारी (दि. २१) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

शहरातील सोमवारचा पाऊस

मगरपट्टा : ३८ मिमीहडपसर : २१ मिमीभोर : १५ मिमीढमढेरे : ९.५ मिमीवडगावशेरी : ७ मिमीशिवाजीनगर : ४.२ मिमीलोणावळा : ३.५ मिमीहवेली : ३.५ मिमीकोरेगाव पार्क : १.५ मिमी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रenvironmentपर्यावरणNatureनिसर्गWaterपाणीDamधरण