ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दि.१५ रोजी १०, दि १६ रोजी ४, दि.१७ रोजी ३, दि.१८ ऱोजी ८, दि.१९ रोजी १४, दि.२० रोजी ४ असे रुग्ण सापडले आहेत. रविवारी ओतूर १ व तेजेवाडी येथे २ असे ३ रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे परिसरातील रुग्णांची एकूण संख्या ९९२ झाली आहे, पैकी ८८१ बरे झाले आहेत, ३९ जणांवर उपचार सुरू आहेत, १३ जण घरीच उपचार घेत आहेत. ४९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली. ओतूर शहरात रविवारी १ रुग्ण सापडल्याने शहरातील बाधितांची संख्या ४९६ झाली आहे. त्यातील ४५० बरे झाले आहेत. १६ जण कोव्हीड केंद्रात तर ६ जण घरीच उपचार घेत आहेत. २४ जणांचा मृत्यू झाला आहे.तेजेवाडी येथे रविवारी २ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ५० झाली आहे. ३८ बरे झाले आहेत. १० जणांवर उपचार सुरू आहेत. १ जण घरीच उपचार घेत आहे. १ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. सारोक्ते यांनी दिली .
ओतूर परिसरात ३ कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:11 AM