ओतूर शहरातील बाधितांची एकूण संख्या ४६६ झाली आहे त्यातील ४३५ बरे झाले आहेत, ८ जण उपचार घेत आहेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे.
धोलवड येथे २ पाॅझिटिव्ह सापडल्याने तेथील बाधितांची एकूण संख्या ३० झाली आहे. त्यातील २४ बरे झाले आहेत २ जणावर तातडीने उपचार सुरू केले आहेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर परिसरातील बाधितांची एकूण संख्या ९०९ झाली आहे . त्यातील ८४५ बरे झाले आहेत १६ जण उपचार घेत आहेत .१ जण घरीच उपचार घेत आहे.४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
परिसरात सोशल डिस्टन्सचे पालन काटेकोरपणे करीत नसल्याने मास्कचा वापर करीत नाही, त्यामुळेच पुन्हा पुन्हा रुग्ण सापडत आहेत असे डॉ. सारोक्ते म्हणाले.