लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्री क्षेत्र नारायणपूर येथे २७ ते २९ डिसेंबर असे ३ दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घेतला आहे. दत्त जयंती उत्सव नारायणपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर नारायणपुरात १४४ कलम अन्वये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
येत्या २७ ते २९ डिसेंबर दरम्यान श्री क्षेत्र नारायणपूर येथे प्रतिकात्मक दत्तजंयती साजरी होणार आहे. त्यामुळे भाविकांनी या कालावधीत श्री क्षेत्र नारायणपूर येथे येऊ नये, नारायणपुरात प्रवेशास मनाई करण्यात येत आहे. दत्तजयंती सोहळा घरी बसल्या ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे पोलीस प्रशासन आणि मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.