शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरातील बाभुळगाव परिसरात ३ घरफोड्या, १२ लाखांचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 19:43 IST

अज्ञात चोरट्याने बाभुळगाव व हिंगणगाव परिसरात घरफोडी करुन १२ लाख २६ हजाराचा ऐवज लुटून ३१ डिसेंबर साजरा केला

इंदापूर: सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत होत असताना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अज्ञात चोरट्याने बाभुळगाव व हिंगणगाव परिसरात घरफोडी करुन १२ लाख २६ हजाराचा ऐवज लुटून ३१ डिसेंबर साजरा केला. तानाजी संभाजी गुरगुडे,कलावती अर्जुन गुरगुडे ( दोघे रा.बाभुळगाव), सुभाष प्रल्हाद देवकर (रा. हिंगणगाव, ता.इंदापूर) या तिघांची घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यांना चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणी तानाजी संभाजी गुरगुडे यांनी तिघांची एकत्रित फिर्याद दिली आहे.    ३१ डिसेंबरच्या रात्री पावणेचारच्या सुमारास अज्ञात चोरट फिर्यादी गुरगुडे यांची घरफोडी केली. वीस हजार रुपयांची रोकड व दागिने असा ४ लाख १६ हजाराचा ऐवज पळवला. त्यानंतर फिर्यादीचे चुलती कलावती गुरगुडे यांच्या घराकडे मोर्चा वळवून ५० हजारांच्या रोख रकमेसह दागिने अशी ६ लाख ९० हजाराची लूट केली. बाभुळगावच्या अलिकडे असणाऱ्या हिंगणगाव मधील सुभाष देवकर यांचे घर फोडून तेथून ही अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपये व दागिने असा १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास केला आहे. हवालदार हेगडे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरHomeसुंदर गृहनियोजनThiefचोर31st December party31 डिसेंबर पार्टीCrime Newsगुन्हेगारीjewelleryदागिनेMONEYपैसा