पुणे : शहरात मंगळवारी २ हजार ४०४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, आजही त्यातुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ आज दिवसभरात ३ हजार ४८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ दरम्यान आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ३० हजारांच्या आत आली असून, सद्यस्थितीला शहरात २९ हजार ७०२ सक्रिय रुग्ण आहेत़
आज दिवसभरात ११ हजार ९९६ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २०़ ०४ टक्के इतकी आहे़ तर दिवसभरात शहरात ७६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ६५ टक्के आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६४५ कोरोनाबाधित रुग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३९९ रुग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आतापर्यंत २२ लाख ९९ हजार ५८३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ५० हजार १३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख १२ हजार ९७० कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ७ हजार ४६१ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------