पुणे : शहरात रविवारी ११ हजार ३७२ इतक्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी ३८९६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. तर ६ हजार २८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरात १४ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ६ रुग्ण पुणे शहराबाहेरील आहेत.
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजार १३३ इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे. सध्या ८७ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ३३१ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी केवळ ४ टक्के रुग्ण रुग्णालयात तर इतर गृह विलगीकरणात आहेत. शहरात ४९३ व्हेंटिलेटर बेड आणि ३९४३ ऑक्सिजन बेड रिक्त आहेत.