पुणे : ‘पीएमपीएमएल’ला सन २०२०-२१ या चालू वर्षातील जून २०२० पर्यंतची तूट भरून काढण्यासाठी ३० कोटी रुपयांची उचल देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शासन निर्णयानुसार सन २०१३-१४ या वर्षापासून ‘पीएमपीएमएल’ला तुटीमुळे होणाऱ्या खर्चातील ६० टक्के हिस्सा महापालिका अदा करत आली आहे़ यानुसार चालू आर्थिक वर्षात दरमहा साडेबारा कोटी रुपये अदा करण्यात येत आहेत. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने विशेष बाब म्हणून महापालिकेकडे अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्यानुसार एप्रिल ते जून २०२० पर्यंतचे ३० कोटी रुपये अदा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
चौकट
घर करारनाम्याचे अधिकार कार्यकारी अभियंत्यांना
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २ हजार ९१८ पात्र लाभार्थ्यांना घरे देताना पुणे महापालिकेच्या वतीने करारनामे करण्याचे अधिकार योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्याचा निर्णय समितीने घेतला.
----------------------------------