पुणे : अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीअखेर ५१ हजार ३४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे तर अद्यापही ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. तिसरी फेरी संपल्यानंतरही मोठ्या संख्येने प्रवेश न मिळू शकल्याने विद्यार्थी व पालक धास्तावले आहेत. केंद्रीय प्रवेश समितीने या प्रक्रियेत योग्य तो हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली.चौथ्या फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे. आता केंद्रीय प्रवेशाच्या २९ हजार ५६० तर कोट्यांतर्गत १५ हजार ४४ अशा एकूण ४१ हजार ८०६ जागा रिक्त आहे. प्रवेश अर्जापेक्षा जागांची संख्या जास्त असली तरी विद्यार्थ्यांना सोयीचे महाविद्यालय मिळू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तिसºया फेरीमध्ये केवळ साडे हजार प्रवेश होऊ शकले. त्यामुळे आता चौथ्या फेरीत ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.रिक्त राहिलेल्या रिक्त जागांचा तपशील व महाविद्यालयांचे कटआॅफ वेळापत्रकानुसार बुधवारी जाहीर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते जाहीरच करण्यात आले नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे कटआॅफ उपलब्ध न झाल्याने गुरुवारी पसंतीक्रम भरण्यासाठी त्यांना अडचणीचा सामना करावा लागला.
प्रवेशापासून ३० हजार विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:27 AM