जुन्नर: जुन्नरमधील माई मोहल्ला येथे अवैधरित्या कत्तल केलेल्या जनावरांचे तीनशे किलो मांस आणि जनावरांचे अवयव वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनासह तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार अमोल चासकर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर शहरातील माई मोहल्ला येथे शनिवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास चारचाकी क्रमांक (एमएच- ०३,बीसी- ८४२७) वाहनामध्ये अवैधरीत्या कत्तल केलेल्या जनावरांचे ३०० किलो मांस व त्यांची विविध अवयव गाडीत रात्रीच्या वेळी भरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी जफर छोटु मिया कुरेशी व इतर दोन अज्ञातांवर गोवंश कायदा, प्राणी संवर्धन कायदा, तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उप निरीक्षक एल के शिंगाडे अधिक तपास करत आहेत.
जुन्नरला जनावरांचे तीनशे किलो मांस जप्त, चारचाकी वाहनासह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमालही ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 7:10 PM
जुन्नरमधील माई मोहल्ला येथे अवैधरित्या कत्तल केलेल्या जनावरांचे तीनशे किलो मांस आणि जनावरांचे अवयव वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनासह तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला.
ठळक मुद्देयाप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल