तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे येथे आमदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथे आमदार अशोक पवार यांच्या 30 लाखांच्या निधीमधून एसटी स्टँड चौक सुधार व व बेलदार वस्ती सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढमढेरे,मार्केट कमिटीचे संचालक सुदीप गुंदेचा, माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, विठ्ठल जेधे, माजी सरपंच विद्याताई भुजबळ, पोपट भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य अनिल भुजबळ, गोविंद ढमढेरे, नवनाथ ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस सुनील ढमढेरे, राजेंद्र केदारी, उमेश भुजबळ, अंकुश गायकवाड, अमोल फुलसुंदर आदी मान्यवर उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरे बेलदार वस्ती येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी