शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नालेसफाईसाठी ३१ मे डेडलाइन

By admin | Published: May 13, 2017 4:54 AM

पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून शहरातील सर्व नालेसफाई व दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश महापौर मुक्त टिळक

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून शहरातील सर्व नालेसफाई व दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश महापौर मुक्त टिळक यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. यामध्ये शहराच्या विविध भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठते, अशी सुमारे १२५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. अशा ठिकाणी पावसाळी गटारांचे काम देखील पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंतची डेडलाइन देण्यात आली असल्याचे मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामाचे नियोजन व आढाव घेण्यासाठी टिळक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेतली. याबाबत त्यांनी सांगितले की, मे महिन्यात नालेसफाई व पावसाळी गटारांची सफाई करण्यात येते. पावसाचे पाणी रस्त्यावर न साठता विनाअडथळा वाहून जावे या उद्देशाने ही कामे केली जातात. यंदा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठते, अशी सुमारे १२५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी नाले सफाई व दुरुस्ती कामे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांनंतर पुन्हा एकदा झालेल्या कामांचा आढाव घेण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.नदीला पूर आल्यानंतर अनेक कुटुंबं सुरक्षित ठिकाणी हलवावी लागतात. यासाठी पूर्व तयारी म्हणून ब्ल्यू लाईनच्या आत येणाऱ्या सर्व इमारती व घरांची माहिती घेऊन किती कुटुंबांना स्थलांतरित करावे लागेल, त्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध कराव्या लागतील, याची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.