अनिल ठोंबरे म्हणाले, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची संख्या १९७ आहे. ऑनलाइनला ६६ हजार ९५१ शिधापत्रिका आहेत. त्यापैकी अंत्योदय शिधापत्रिका चार हजार ७२८ आहेत. यामध्ये प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी दोन लाख ८४ हजार २६६ व अंत्योदय लाभार्थी संख्या २१ हजार ७१० असे एकूण तीन लाख पाच हजार ९७६ लाभार्थी आहेत. अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत इंदापूर तालुक्यात माहे मे महिन्यासाठी प्राप्त नियतन व धान्य वाटप करण्यात येणार आहे.
राज्य शासनाकडून अंत्योदय चार हजार ७२८ शिधापत्रिकेचे २१ हजार ७१० लाभार्थ्यांकरिता गहू एक हजार १८२ क्विंटल व तांदूळ ४७२.८० क्विंटल, अंत्योदय शिधापत्रिकेसाठी गहू २५ किलो, तांदूळ १० किलो मोफत तसेच अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ६२ हजार २२३ शिधापत्रिकेचे दोन लाख ८४ हजार २६६ लाभार्थ्यांकरिता गहू ८५२७.९८ क्विंटल, तांदूळ ५६८५.३२ क्विंटल प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय ४७२८ शिधापत्रिकेचे २१७१० लाभार्थ्यांकरिता गहू ६५१.३० क्विंटल व तांदूळ ४३४.२० क्विंटल प्रती व्यक्ती गहू ३ किलो, तांदूळ २ किलो मोफत तसेच अन्नसुरक्षा ६२२२३शिधापत्रिकेचे २८४२६६ लाभार्थ्यांकरिता गहू ८५२७.९८ क्विंटल, तांदूळ ५६८५.३२ क्विंटल प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. एकूण तालुक्यात मे महिन्यासाठी ३ लाख ५ हजार ९७६ शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना १८ हजार ८८९ क्विंटल गहू व १२ हजार २७८ क्विंटल तांदूळ मंजूर आहे
सर्व रेशन दुकानदार यांनी ऑनलाईन असलेल्या शिधापत्रिकाधारकांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा प्रसार लक्षात घेता सोशल डिस्टसिंग ठेवून, सॅनिटायझरचा वापर करून वेळेत धान्य वाटप करावे. जिल्हाधिकारी यांनी सदरचे मोफत धान्यवाटप मुदतीत व विनातक्रार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असल्यामुळे कामकाज मुदतीत पूर्ण करणेबाबत लक्ष देऊन कार्यवाही करावी, असे ठोंबरे यांनी सांगितले.