शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

देशात ३१६ लाख टन साखर उत्पादन, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले

By नितीन चौधरी | Published: June 03, 2024 6:56 PM

उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे तर साखरेचे उत्पादनही गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले

पुणे : देशभरातील एकूण ५३४ कारखान्यांपैकी तमिळनाडूतील तीन कारखान्यांच्या अपवाद वगळता २०२३-२४ च्या ऊसगाळप हंगामाची ३१ मे अखेर सांगता झाली. त्यानुसार यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसापासून ३१६.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे तर साखरेचे उत्पादनही गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले आहे. देशात यंदा महाराष्ट्राने साखर उत्पादन पहिला क्रमांक पटकावला असून राज्यात ११०.२० लाख टन उत्पादन झाले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशाने १०३.६५ लाख साखरेचे उत्पादन घेतले आहे.

तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांतील विशेष गाळप हंगामदेखील सप्टेंबरपर्यंत चालणार असून त्यातून तयार होणारे अपेक्षित साखर उत्पादन लक्षात घेऊन यंदाच्या हंगाम अखेर देशपातळीवर एकूण ३२१.२५ लाख टन इतके निव्वळ साखर उत्पादनाची अपेक्षा आहे. तर २१ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीकडे वळविली जाणार आहे. यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसाचे गाळप झाले असून ते गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे. तसेच निव्वळ साखरेचे उत्पादन देखील गतवर्षीपेक्षा ९.६५ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, यंदा देशपातळीवर सरासरी साखर उतारा १०.२० टक्के मिळाला असून तो गेल्या वर्षी पेक्षा ०.२६ टक्क्याने जास्त आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या यंदा पर्जन्यमान सर्वदूर आणि समाधानकारक राहण्याचा अंदाज असून त्याचा फायदा उसाच्या वाढीसाठी तसेच आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी फायदेशीर ठरणार आहे. नवीन लागण होणाऱ्या उसाची उपलब्धता ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामासाठी होणार नसून तो ऊस पुढील वर्षाच्या ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या गाळप हंगामामध्ये वापरला जाईल. त्यामुळे २०२४-२५ च्या हंगामात साखर उत्पादन वाढणार नाही. परिणामी आतापासूनच साखर उत्पादनाचे अंदाज वर्तवणे घाईचे होईल असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केले आहे.

राज्यनिहाय साखर उत्पादन (लाख टनांमध्ये)

महाराष्ट्र ११०.२०उत्तर प्रदेश १०३.६५कर्नाटक ५२.६०गुजरात ९.२०तमिळनाडू ८.८५बिहार ६.८५पंजाब ६.२०हरयाना ५.९०मध्य प्रदेश ५.२०उत्तराखंड ३.१०आंध्र प्रदेश १.६०

उर्वरित देश १.५०

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसMONEYपैसाGovernmentसरकारHealthआरोग्य