५ मार्च २०२० रोजी अश्विनी अमोल वाघोले यांच्या मालकीच्या यशोधन एचपी गॅस एजन्सी या खात्यावर बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा वाल्हे बँकेच्या खात्यामध्ये अचानक ३२ लाख ६८ हजार ८५ रुपयेे जमा झाले होते. बॅंकेला तीन दिवस सुट्टी असल्यामुळे ते पैसे कोणत्या खात्यातून आले हे समजत नव्हते, त्यामुळे मंगळवारी बँक चालू झाल्यानंतर वाघोले या स्व:च बँकेत गेल्या व अधिकाऱ्यांना चौकशी केली. अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही त्यामुळे अश्विनी व अविनाश वाघोले यांनी बँकेला लेखी पत्र देऊन ती रक्कम बॅंकेने परत घ्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर त्याची तपासणी केल्यावरी ही रक्कम एका खासगी कंपनीच्या खात्यातून चार महिन्यांपासून अश्विनी वाघोले यांच्या खात्यावर गेली असल्याचे निष्पन्न झाले.
--
ज्यांचे पैसे आले त्यांच्याकडून एकदाही चौकशी नाही
गेल्या चार महिन्यांपासून संबंधित कंपनीने एकदाही यशोधन गॅस एजन्सी मध्ये गायब झालेल्या रकमेची चौकशी केली नाही. आज अखेर बँकेने नजर चुकीने आलेली ३२ लाख ६८ हजार ८५ रुपये परत संबंधित कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. त्यानंतरही कंपनीच्या वतीने याबाबत बॅंकेला जाब विचारला नाही की या घटनेची विशेष दखल घेतली नाही.