शनिवारी ३२ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या ३ हजार ४३६ झाली आहे. यातील ३ हजार १५७ बरे झाले आहेत. १२३ कोविड सेंटर तर ४० घरीच उपचार घेत आहेत ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. ओतूर शहरातील बाधितांची संख्या १ हजार ४३८ झाली आहे. यापैकी १ हजार ३३९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४२ जण कोविड सेंटर तर १५ जण घरीच उपचार घेत आहेत तर ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील ३४६ पैकी ३०९ बरे झाले आहेत. २६ जण उपचार घेत आहेत तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील १८५ पैकी १६८ बरे झाले आहेत. १२ जण उपचार घेत आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंंगोरे येथील ३२६ पैकी ३०९ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. खामुंडी येथील १७९ पैकी १५० बरे झाले आहेत २१ जण उपचार घेत आहेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अहिनवेवाडीत २१ पैकी १७ बरे झाले आहेत ४ जण उपचार घेत आहेत. आंबेगव्हाण येथील ३० पैकी २७ बरे झाले आहेत. एकावर उपचार सुरू केले आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूरमध्ये शनिवारी ३२ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:13 AM