इंदापूर : कोरोनाच्या कालावधीत मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा, तब्बल दीड वर्षानंतर प्राथमिक स्तरावर चालू करण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेले कोरोनाचे सर्व नियम पाळून तालुक्यातील एकूण ३२ शाळा चालू करण्यात आले आहेत. अशी माहिती तालुका गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी तब्बल ३२ सुरू झाल्या शाळा सुरू झाल्या असून, आठवी ते बारावीचे वर्ग शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार झाले सुरू झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक गोखळी गावातील, गुरुकुल विद्यामंदिर गोखळी च्या शाळेत पहिल्याच दिवशी ७५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थित आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यासदंर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्या शासन निर्णयानुसार आज गुरुवार ( दि. १५ जुलै ) पासून इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागात तब्बल पहिल्याच दिवशी ३२ शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सर्व शाळांना कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणाने पालन करून, एका बाकावर एक विद्यार्थी व दोन बाकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवत, शाळा आज व्यवस्थित पणे सुरु झाली आहेत. प्रत्येक शाळेमध्ये सतत साबणाने हात धुन्या ची सुविधा करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच शासनाकडूम जे काही नियम लागू केले आहेत, त्याची पूर्ण दक्षता या ठिकाणी घेतली जात आहे.
इंदापूर तालुक्यातील गुरुकुल विद्यामंदिर गोखळी शाळेत कोरोनाची पुर्ण खबरदारी घेवून, एका बाकावर एक विद्यार्थी बसवून, दोन बाकांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवत शाळा नियमीत चालू करण्यात आली आहे. इयत्ता ८ वी ते ११ वी वर्गाचा पट हा ४२५ आहे. त्यातील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती ३१० म्हणजे एकूण ७५ टक्के विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेत उपस्थित होते. त्यामुळे या शाळेचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.