पुणे : शहरात रविवारी २५० नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात ३२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजमितीला शहरात २ हजार ७९२ सक्रिय रुग्ण आहेत.
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ९८७ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ३.५७ टक्के इतकी आहे. आज ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २३१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४९ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २८ लाख ३९ हजार ६८५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८५ हजार ७१६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७४ हजार १९३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे.