३४० नागरिकांना एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा विक्रम अवसरी गावाने केला आहे. डॉ. शशिकांत मुरकुटे, डॉ. ए. बी. तोडकर, आरोग्य सेविका जे. पी. गायकवाड, एच. आर. कांबळे, आशा वर्कर, कॉम्प्युटर ऑपरेटर ए. ए. सुरसे या आरोग्य कर्मचाऱ्यांचा लस देण्यात सिंव्हाचा वाटा होता. अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी येथे एकाच दिवशी एकूण ९४० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी सांगितले.
लसीकरण केल्यानंतर अर्धा तास निरीक्षणासाठी नागरिकांना ठेवण्यात आले व लस घेतलेल्या नागरिकांना थंडी, ताप, चक्कर येऊ नये म्हणून पॅरासिटेमॉल गोळ्या देण्यात आल्या.
कोरोना लसीचे संपूर्ण नियोजन सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, अजित चव्हाण, स्वप्नील हिंगे, ग्रामविकास अधिकारी दीपक शिरसाट, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सर्जेराव हिंगे, पोलीस पाटील माधुरी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
--
०८ अवसरी बुद्रूक
--