शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

अनधिकृत बांधकाम प्रकरणी ३५ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 7:04 PM

अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम सुरु अवस्थेत असताना थांबविण्यासाठी वारंवार नोटीसा व तोंडी सूचना बजविण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील बांधकाम सुरु ठेवले होते. 

ठळक मुद्देपीएमआरडीए क्षेत्र : वारंवार नोटीसा देऊनही जुमानले नाहीनऱ्हे , मारुंजी, मांजरी या भागात अनधिकृत बांधकाम कारवाई या गुन्ह्यामध्ये ५ हजार रुपयांपर्यंत दंड व ३ वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा

पुणे : अनधिकृत बांधकाम पाडण्यात अडसर निर्माण केला. हडपसर व हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३५ जणांवर २२ जून २०१८ पर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. संबधित सर्व बांधकामाचा व्यावसायिक व रहिवाशी जागेसाठी वापर केला जात होता, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२,५३,५४,५५ व १८ अन्वये भारतीय दंडसाहिंता कलम ३४ प्रमाणे बांधकाम नियमितीकरणाचे कागदपत्रे हजर न केल्यामुळे संबधित अनधिकृत बांधकाम धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम सुरु अवस्थेत असताना थांबविण्यासाठी वारंवार नोटीसा व तोंडी सूचना बजविण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील बांधकाम सुरु ठेवले होते. नऱ्हे , मारुंजी, मांजरी या भागात अनधिकृत बांधकाम कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वास्तूविशारद , अभियंता, स्ट्रक्चरल अभियंता, मालक व विकसक यांच्यावर करण्यात आली आहे. हे सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत. या गुन्ह्यामध्ये ५ हजार रुपयांपर्यंत दंड व ३ वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते. अनधिकृत बांधकाम पथक १ व २ मार्फत सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड व अनधिकृत बांधकाम विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पीएमआरडीए हद्दीतील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी जानेवारी २०१८ पासून ७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही मुदत चार महिने २१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत वाढून देण्यात आली होती. ...................१ लाख ५ हजार चौरसफूट अनधिकृत बांधकामांवर कारवाई जानेवारी २०१८ पासून १ लाख ५ हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले आहे. तर २२ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच नोंदणी महानिरीक्षक व महावितरण कार्यालयाना अनधिकृत बांधकाम नोंदणी केली जाऊ नये. यासाठी विनंती करण्यात आली आहे. ..........................अनधिकृत बांधकाम कारवाई सुरु राहणार आहे. अनधिकृत बांधकाम खरेदी करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका खोटी माहिती देऊन स्वस्त दराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांचे आर्थिक नुकसान टळावे याकरिता नागरिकांनी जागरूक राहावे. - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए 

टॅग्स :PuneपुणेhadapsarहडपसरPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते