पुणो : डेंगूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून विशेष घेण्यात आलेली मोहीम आज अधिक तीव्र करण्यात आली. आज दिवसभरात शहरात आरोग्य विभागाच्या विविध पथकांनी तब्बल 114 जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, तब्बल 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर आज दिवसभरात डेंगूची लागण झालेले नवीन 35 रुग्ण आढळून आले आहेत.
नुकत्याच झालेल्या मुख्यसभेत डेंगूची साथ रोखण्यासाठी प्रशासनाने परिणामकारक कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार, आजपासून संपूर्ण शहरात जोरदार सर्चमोहीम प्रशासनाकडून राबविण्यात आली. त्यात प्रामुख्याने बांधकामे, तसेच टायर दुकानांची तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी डासांची पैदास आढळून आली आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना तब्बल 46 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या कीटक प्रतिबंधात्मक विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. दरम्यान, आज दिवसभरात सुमारे 35 नवीन रुग्ण आढळून आले असून, या आठवडय़ातील रुग्णांची संख्या
16क् वर पोहोचली आहे, तर या महिन्यातील रुग्णांची संख्या 626 वर पोहोचली आहे. (प्रतिनिधी)