उरुळी कांचन : हवेली तालुक्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांसाठी ७ कोटी रुपये किमतीच्या ३५२ रोहित्रांना मंजुरी मिळाली आहे. शेतक-यांना योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रत्येक शेतक-याच्या दारी रोहित्र (एच.व्ही.डी.एस.)’ योजनेअंतर्गत ८७ रोहित्रांंना मंजुरी मिळाली आहे. शेतकरी रोहित्रापासून वंचित राहणार नाहीत, असे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले.राज्य शासनाने नुकतीच एक किंवा दोन शेतकºयांच्या कृषीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी एच.व्ही.डी.एस. योजना जाहीर केली. योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम मंजूर झालेल्या कोरेगाव मूळ (ता. हवेली ) येथील ललिता उत्तम काकडे या लाभार्थी शेतकºयाला मंजूर रोहित्राचे वितरण आ. बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास हवेली बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, कोरेगाव मूळच्या सरपंच कविता काकडे, उपसरपंच नानासाहेब शिंदे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, अजिंक्य कांचन, उरुळी कांचन ग्रा.पं. सदस्य संतोष कांचन, सुनील कांचन, कोरेगाव मूळचे माजी सरपंच प्रमोद बोधे, नायगावच्या उपसरपंच कल्पना चौधरी, माजी उपसरपंच विकास चौधरी, गणेश चौधरी, उरुळी कांचन उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, हडपसर उपविभाग उपकार्यकारी अभियंता अमित भरते, मुळशी विभाग उपकार्यकारी अभियंता राजेंद्र भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते बबन कोलते, मुकुंद काकडे, सचिन कड, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गायकवाड उपस्थित होते.>आमदार बाबूराव पाचर्णे पुढे म्हणाले, की एच.व्ही.डी.एस. योजनेने शेतकºयांना उच्च दाबाने वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. एक किंवा दोन शेतकºयांच्या बांधावर रोहित्र बसवून पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळणार आहे. कृषीपंप जळून निकामी होऊ नये म्हणून या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ होणार आहे. हवेली तालुक्यात ८७ रोहित्रांना या योजनेत मंजुरी मिळाली आहे. सहा महिन्यांत हे जोड शेतकºयांना मिळतील.
हवेली तालुक्यात कृषीपंपांसाठी ३५२ रोहित्रांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:47 AM