शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अकरावीच्या ३६ हजार जागा रिक्त ; काही विद्यार्थी मात्र प्रवेशापासून वंचित 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 6:48 PM

या प्रक्रियेत दरवर्षीप्रमाणे काही अडचणींचा सामना करावा लागला सामना..

ठळक मुद्दे कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी शाखेच्या १ लाख ४ हजार १३९ जागा उपलब्धकेवळ ७७ हजार २८० विद्यार्थ्यांनीच केली होती नोंदणी ३६ हजार जागा रिक्त असताना काही विद्यार्थी मात्र अजूनही प्रवेशापासून वंचित

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पुणे व पिंपरी चिंचवडमधील तब्बल ३६ हजार जागा रिक्त राहिल्या आहे. सुमारे ६८ हजार विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. सुमारे ७७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २९६ कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेत दरवर्षीप्रमाणे काही अडचणींचा सामना करावा लागला. या प्रक्रियेअंतर्गत मुख्य तीन प्रवेश फेऱ्यांसह एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वानुसार तीन अशा एकुण ७ फेऱ्या झाल्या. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी शाखेच्या १ लाख ४ हजार १३९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी केवळ ७७ हजार २८० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली होती. त्यामुळे किमान ३० हजार जागा रिक्त राहणार असल्याचे सुरूवातीलाच स्पष्ट झाले होते.त्यानुसार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५९ हजार १९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रक्रियेतून प्रवेश घेतला. तर अल्पसंख्यांक कोट्यातून ३ हजार १६७, व्यवस्थापन कोट्यातून २ हजार २४४ आणि इन हाऊस कोट्यातून ३ हजार ४७२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. एकुण ६७ हजार ९०२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे. प्रवेश क्षमता व झालेल्या प्रवेशाचा विचार केल्यास एकुण ३६ हजार २३७ जागा रिक्त राहिल्याची माहिती प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रविण अहिरे यांनी दिली. समितीकडून शाखानिहाय प्रवेशाची माहिती प्रसिध्द करण्यात आली नाही. दरम्यान, प्रामुख्याने रिक्त जागांमध्ये कला शाखेतील सर्वाधिक जागा आहेत. दरवर्षी कला शाखेतीलच अनेक जागा रिक्त राहतात. यंदाही पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये कला शाखेला मिळालेली विद्यार्थ्यांची पसंती खुप कमी होती. त्यामुळे यंदाही कला शाखेचे वर्ग रिकामे राहिल्याचे चित्र आहे............३६ हजार जागा रिक्त असताना काही विद्यार्थी मात्र अजूनही प्रवेशापासून वंचित  एकीकडे इयत्ता अकरावी प्रवेशाच्या ३६ हजार जागा रिक्त असताना काही विद्यार्थी मात्र अजूनही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रवेश अद्याप लटकलेला आहे. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यां नी दिल्या आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत.

इयत्ता अकरावी प्रवेशाच्या अंतिम फेरीमध्ये काही विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या महाविद्यालयातील प्रवेश काही कारणांनी रद्द केले. त्यांना इतर महाविद्यालयात प्रवेश हवा होता. प्रवेश समितीकडून त्यासाठी दि. १ ऑक्टोबपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत प्रवेशाच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत प्रवेश घेता आला नाही. संकेतस्थळातील बिघाडाबाबत विद्यार्थी व पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडेही तक्रार केली. मात्र, ही प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यात येते. त्यामध्ये एकही प्रवेश आॅफलाईन पध्दतीने होत नाही. प्रक्रियेमध्ये बदल करणे किंवा मुदत वाढ देणे याचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जातो. अद्याप शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

प्रवेशाची मुदत संपून दहा दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांना अद्याप काहीच ठोस माहिती मिळत नाही. त्यांना सातत्याने कार्यालयाचे फेºया माराव्या लागत आहे. सध्या निवडणुकीचा कालावधी आहे. त्यामुळे या कालावधीत निर्णय होण्याची शक्यता धुसर आहे. परिणामी, पुणे व पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्राबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला जात आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते.------------ 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीonlineऑनलाइनcollegeमहाविद्यालय