आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी आदींची दोन दिवस कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली. कोविड चाचणीनंतर संबंधित वारकऱ्यांना लगतच्या फ्रुटवाले धर्मशाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. दरम्यान, संबंधित वारकऱ्यांच्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर पहिल्या अहवालात २२, तर दुसऱ्या अहवालात १५ सोहळ्यांत सहभागी होणारे वारकरी, आळंदीच्या नगराध्यक्षा तसेच मंदिरातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेले वारकरी आळंदीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊ देण्यावर संबंधित प्रशासनाने मज्जाव केला. आळंदीच्या प्रथम नागरिक पालिकेच्या नगराध्यक्षाही खबरदारी घेत सोहळ्यात सहभागी झाल्या नाही.