पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी ३ हजार ७२४ जादा बसचे नियोजन केले आहे. नियमित वेळापत्रकानुसार धावणाºया बससह या जादा बसचा ताफा भाविकांसाठी उपलब्ध असेल. यात्राकाळात विविध विभागात तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार असून त्यासाठी उपाहारगृह, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका या सुविधाही दिल्या जाणार आहेत.
आषाढी यात्रेनिमित्त वाहतुक नियोजनासाठी परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी भोसरी येथील एसटीच्या केंद्रीय प्रशिक्षण संस्थेमध्ये बैठक घेतली. यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरपुरात येतात. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यासाठी एसटीकडून दरवर्षी जादा बस सोडल्या जातात. त्यानुसार या बैठकीमध्ये ३ हजार ७२४ जादा बसच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे सुमारे ५ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे दि. १० ते १६ जुलै या कालावधीत अहोरात्र कार्यरत राहतील, अशी माहिती रावते यांनी दिली.नियोजित ३ हजार ७२४ बसेस पैकी, नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या सुमारे १२०० आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पंढरपूरकडे येणाºया विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. जादा बस सोडण्यासाठी एसटीकडून ठिकठिकाणी तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी केली जाणार आहे.या स्थानकांवर उपहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जादा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाºया बसेस या यांत्रिक दृष्ट्या निदोष, तंदुरुस्त असल्या पाहिजे तसेच त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत, याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहण्याच्या सुचना रावते यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.जादा बसेसचे नियोजनविभाग जादा बसऔरंगाबाद १०९७पुणे १०८०नाशिक ६९२अमरावती ५३३मुंबई २१२नागपूर ११०