पुणे : आषाढी यात्रेनिमित्त एस. टी महामंडळातर्फे राज्याच्या विविध भागातून ३७८१ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी एकूण जादा बसेसपैकी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे या काळात पंढरपुर येथे तात्पुरत्या स्वरूपाची तीन बसस्थानकेही उभारली जाणार आहेत.आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकारी व सर्व जिल्ह्याचे विभाग नियंत्रक यांची शुक्रवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत जादा बसेस सोडण्यावर निर्णय घेण्यात आला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे २३ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भक्तांचा मेळा भरतो. आषाढी यात्रेला राज्यभरातून विशेषत: मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांना सुरक्षितरित्या प्रवास घडवून आणण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. २१ जुलै ते २८ जुलै या यात्रा काळामध्ये एसटीचे सुमारे ८ हजार कर्मचारी अहोरात्र सेवा देणार आहेत . यात्रा काळात राज्यातील विविध आगारांमधून ३ हजार ७८१ जादा बस सोडल्या जाणार आहे. याबाबतचे नियोजन आगार स्तरावरून केले जाणार आहे. त्याचप्रमाणे दि. २१ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याला जाण्यासाठी एसटीने पंढरपूरहून १०० जादा बसेसची सोय केली आहे. या मार्गावर दिवसभर बससेवा सुरू राहणार आहे. तसेच पंढरपूरहून ७ कि.मी.अंतरावर असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानकावर जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवासांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे ३ तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. मराठवाड्यांच्या प्रवाशांसाठी भीमा बसस्थानक, पुणे-मुंबई येथे जाणाºया प्रवाशांसाठी चंद्रभागानगर बसस्थानक व जळगाव-नाशिक येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पंढरपूरजवळील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानक उभारण्यात येणार आहे.याठिकाणी पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, फिरती स्वच्छतागृह, उपहारगृह, रुग्णवाहिका, प्रत्येक विभाग निहाय चौकशी कक्ष संगणकीय उद्घोषणा आदी सुविधा असतील. तसेच तिन्ही बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.------------आगाऊ आरक्षणाची सुविधापरतीच्या प्रवासासाठी जादा बसेस पैकी सुमारे १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांनी एस. टी महामंडळाच्या www.Zsrtc.gov.i»»f या अधिकृत संकेतस्थळावरून आॅनलाईन आरक्षण करावे. त्याचबरोबर २१३ reservÔtio»»f Zobi’e Ôpp चा वापर करावा. तसेच यावर्षी अभिनव प्रायोग म्हणून पंढरपूर येथील ज्या ठिकाणी वारकऱ्यांचा निवास असतो (मठ, यात्री निवास, धर्मशाळा) अशा ठिकाणी एसटीचे कर्मचारी स्वत: जाऊन प्रवाशांच्या मागणीनुसार आगाऊ आरक्षण करून देतील. या सुविधेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
आषाढी यात्रेनिमित्त ३७८१ जादा बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 7:32 PM
दरवर्षी प्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांना सुरक्षितरित्या प्रवास घडवून आणण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. २१ जुलै ते २८ जुलै या यात्रा काळामध्ये एसटीचे सुमारे ८ हजार कर्मचारी अहोरात्र सेवा देणार आहेत.
ठळक मुद्देआषाढी यात्रेला राज्यभरातून विशेषत: मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक२१ जुलै ते २८ जुलै या यात्रा काळामध्ये एसटीचे सुमारे ८ हजार कर्मचारी अहोरात्र सेवा देणार पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, फिरती स्वच्छतागृह, उपहारगृह, रुग्णवाहिका, प्रत्येक विभाग निहाय चौकशी कक्ष संगणकीय उद्घोषणा आदी सुविधा