पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 38 उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पात्र 46 उमेदवारांपैकी आठ जणांनी माघार घेतली रिंगणात 38 उमेदवार असल्याने जिल्हा निवडणूक शाखेची डोकेदुखी वाढली असून मतदानासाठी तीन ईव्हीएम लागणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 51 उमेदवारांनी उमेदवारांचे अर्ज भरले होते. छाननी मध्ये पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर 46 उमेदवारांचे वय अर्ज आज माघारीच्या दिवशी कायम राहिले होते अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांनी माघार घेतल्याने निवडणुकीसाठी 38 उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत असणार आहे. अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सचिन खरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके यांनी भरलेला अपक्ष अर्ज यांचा समावेश आहे.