तालुक्यातील १०४ पैकी अवघ्या ३८ शाळा आज गुरुवारी सुरु होत्या तर विद्यार्थी संख्या १५०१ शाळेच्या पटानुसार उपस्थित होती. ९ ते १२ वी च्या वर्गाची पटसंख्या १०४ शाळांमध्ये २४ हजार ८९३ इतकी आहे.यावरुन विद्यार्थी शाळेत अद्यापही येण्यास तयार नसल्याने शिक्षकांचा कोंडमारा होऊन यंदाचे शैक्षणिक वर्ष अंधातरीच आहे.
गुरुवार दि.३ डिसेंबर रोजी तालुक्यातील ९-१० वी वर्गाच्या शाळां सुरु होण्याचा आढावा घेतला असता शाळानिहाय कंसात पटसंख्या आणि आज उपस्थित विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे कुरुळीः - (४२०) ७ विद्यार्थी हजर, दोंदेः - ( ६०) ०२ हजर , गुळाणीः-(३९) १ हजर , म्हाळुंगेः-(२४) १ हजर , शिंदेः (१७९) २ हजर , कोंहिडेः -(८६) २ हजर , टाकळकरवाडीः-( ११६) ४ हजर , मरकळः (४१) २ हजर, कनेरसरः- (१६ ) १ हजर , पिंपरीः-(१०१ ) ०५ हजर , शेलपिंपळगावः-(१२९) ०३ हजर , रासेः-(१५७) ०४ हजर अशा ३४ शाळांची १३६८ एकुण पटसंख्येनुसार अवघे ३४ विद्यार्थी हजर असल्याचे चित्र पहावयास मिळाले.