एस.सी. संवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीस दरवर्षी विलंब होतो. अनेक गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत असतात. यंदा कोरोनामुळे शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शिष्यवृत्तीची प्रक्रिया ही उशिरा सुरू झाली. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ४ लाख ९५ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली. त्यातील ५१ हजार विद्यार्थ्यांनी स्वतः अर्ज रद्द केले. शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ७३५ विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थात्मक पातळीवर प्रलंबित आहेत.
राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या एससी संवर्गातील ४ लाख २ हजार ६०३ विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थात्मक स्तरावरून मंजूर करण्यात आले आहेत. ३ लाख ८० हजार ९३० विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आले आहे. तसेच ३ लाख ४२ हजार ३६२ त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे.
-------------------
राज्यातील विद्यार्थ्यांना दिलेली शिष्यवृत्तीची रक्कम : १८४ कोटी
राज्यातील संस्थांना द्यावी लागलेली शिष्यवृत्तीची रक्कम : ९२८ कोटी
---------------------
पुणे जिल्ह्यातील ४५ हजार ९२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली.त्यातील ३४ हजार ३४४ विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थात्मक पातळीवर मंजूर करण्यात आले. जिल्ह्यातील ३३ हजार ४१२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. समाज कल्याण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पुण्यातील ३ हजार ७४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही.