शिरूर तालुक्यात आतापर्यंत ९ हजार ८०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ८ हजार ९२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १८६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १ हजार ५२५ विविध रुग्णालयात उपचार घेत आहे.
शिरूर तालुक्यात सोमवारी सणसवाडी २०, शिक्रापूर ७३, तळेगाव ढमढेरे २२, कासारी १, निमगाव म्हाळुंगी १२,पारोडी २,दरेकरवाडी १,कोंढापुरी १,टाकळी भीमा २, बुरुंजवाडी १,,कोरेगाव भीमा ८,रांजणगाव गणपती २४, वाघाळे ४, ढोकसांगवी १, भांबर्डे १,पिंपरी दुमाला २, खंडाळे १,कुरूळी १, मांडवगण फराटा ४४, सादलगाव १,इनामगाव ३,वडगाव रासाई ३, शिरसगाव काटा ६, तांदळी १, बाभुळसर खुर्द ६, न्हावरे १३, उरळ गाव ३, नागरगाव २, गुनाट १, रांजणगाव सां १, निर्वी १, आंबळे ६, चिंचणी ३, आंधळगाव ५, निमोने ५, पिंपरखेड ६, जांबुत ३,काठापुर १, टाकळीहाजी ५, कारेगाव १४, शिरूर ग्रामीण २४, सरदवाडी २, तर्डोबाचिवाडी ९, करडे १, मलठण ३,करडीलवाडी १,चव्हाणवाडी १, निमगाव भोगी १,केंदुर १, करंदी १,,पाबळ २, पिंपळेेे जगताप १,आपटी १,धामारीीू २ वढू बुद्रुक ४,शिरूर शहर २० असे शिरूर तालुक्यातील ५६ गावांत ३८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर एक मृत्यू झाला.
नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, गर्दी करू नये ,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, फिजिकल डिस्टन्स पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.