पुणे: पंचवीशीच्या आतील तरूणाई म्हणजे सळसळते रक्त. परंतू, बदलत्या जीवनशैलीमुळे या तरूणाईचा प्रवास स्थुलतेकडे हाेत असल्याचे दिसून आले आहे. अयाेग्य खाण्याच्या सवयी, बैठे काम, वाढता तणाव, मद्यपान व तंबाखूचे सेवन या कारणांमुळे पंचवीशीच्या आतील ३९ टक्के तरूण लठठपणाकडे झुकत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
एका खासगी प्रयाेगशाळेने याबाबत पुण्यातील १२ हजार तरूण - तरूणींची जून २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी केली. त्यामधून हा निष्कर्ष समाेर आला आहे. या अहवालातून असेही समाेर आले आहे की १७ टक्के महिलांना व २० टक्के पुरूषांना मधुमेह होण्याचा धोका आहे. तसेच ४० टक्के महिलांना व ३५ टक्के पुरूषांना एथेरोस्क्लेरोसिस (रक्तवाहिनी ब्लाॅक) होण्याचा धोका आहे.
सर्वेक्षणात काय आढळले?
- २९.३ टक्के महिलांना अॅनेमिया होण्याची शक्यता आहे, तुलनेत हे प्रमाण पुरूषांसाठी ५.६ टक्के आहे.- कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेदरम्यान, तसेच कोविडनंतरच्या काळात पुरूष व महिलांमध्ये उच्च रक्तदाबाच्या प्रमाणमध्ये वाढ झाली.- उच्च रक्तदाबासह मधुमेह आणि इतर अनेक आजार होण्यासाठी तणाव हा सर्वात महत्त्पूर्ण कारणीभूत घटक आहे.- दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम, ध्यान, योगासने अपरिहार्य आहेत.
काय आहेत उपाययाेजना
-आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे- आजार झाल्यावर उपचारासाठी येणा-या खर्चापैकी १० टक्के खर्च हा प्रतिबंधात्मक उपाययाेजनांवर करणे आवशक- स्त्रियांनी पौष्टिक आहार, मासिक पाळी व हार्मोनल आजार, नियमित आरोग्य तपासणी केल्यास अॅनेमिया होण्यास कारणीभूत असलेले लोह व व्हिटॅमिन बी १२ कमतरता भरून निघेल.
‘‘कोविडनंतर लोक त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक बनले आहेत आणि तरूण पिढी व कुटुंबातील सदस्यांसह नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यास येत आहेत.’’ - अमोल नायकवडी, इंडस हेल्थ प्लस