विद्यार्थी संख्येप्रमाणे संबंधित पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागाच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाच्या महामारीमुळे या वर्षी शाळा उशिरा सुरु होत असल्याने विद्यार्थ्यांना दोनऐवजी एकच गणवेश मिळणार आहे.
तसेच प्रथम नववी ते बारावी त्यानंतर पुढे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आता शासनस्तरावर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांना दरवर्षी शासन सर्व जातीच्या मुली अनुसूचित जातीची मुले, अनुसूचित जमाती मुले व दारिद्र्यरेषेखालील मुलांना दोन गणवेशासाठी सहाशे रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. परंतु चालू वर्षी कोरोना महामारीमुळे शाळा उशिराने सुरू होत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच गणवेशासाठी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुलांना लवकरच नवीन गणवेश मिळणार आहे. शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांर्तंगत इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत गणवेश अनुदान उपलब्ध करुन देणे स्वागतार्ह आहे.
कोट
"
पुणे जिल्हा परिषदेने मात्र ऐतिहासिक निर्णय घेत पुणे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या व शासनाच्या गणवेश अनुदान योजनेपासून वंचित असणाऱ्या सर्वच संवर्गातील मुलांसाठी गणवेशासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणवेश अनुदान योजनेपासून वंचित राहणाऱ्या सर्वच मुलांना न्याय मिळणार आहे.
- दत्तात्रय वाळुंज, माजी अध्यक्ष, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ
तालुका,
तालुका पात्र लाभार्थी विद्यार्थी संख्या मिळालेले अनुदान
आंबेगाव ८४४३ २५३२९००
बारामती ११९८७ ३५९६१००
भोर ७३१ २०१९३००
दौंड १२६६५ ३७९९५००
हवेली १९९८६ ५९९५८००
इंदापुर - १२९६४ - ३८८९२००
जुन्नर - १३६९४ ४१०८२००
खेड २२०२३ ६६०६९००
मावळ १३५१९ ४०५५७००
मुळशी - १०१९५ ३०५८५००
पुरंदर - ६८३५ - २०५०५००
शिरुर - १७९४० ५३८२०००
वेल्हा २४०० ७२००००
उर्दू माध्यम - ०९ - २७०० एकूण - १५९३९१ - ४७८१७३००