पुणे : नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत सुमारे २२ कोटींचा अपहरण केल्याच्या आरोपावरुन बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक, कर्ज उपसमितीमधील सदस्य, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आदींवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यातील संचालक राधा वल्लभ कासट, अशोकलाल कटारिया, अनिल कोठारी आणि अजय बोरा यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
चिंचवडमधील इंडियन इंजिनिअरीगच्या नावे ११ कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत अर्ज करुन त्यासाठी त्यांचा प्लॉट व बंगला गहाण ठेवला होता. व्यवस्थापनाने साडेसहा कोटींचे कर्ज मंजूर केले असतानाही संचालक मंडळाने दुर्लक्ष करून २२ कोटींचे कर्ज मंजूर केले. २२ कोटी रुपये आरोपीच्या खात्यावर वर्ग केली.
अर्जदारांच्या वतीने अॅड. सचिन झालटे पाटील व अॅड. अभिषेक जगताप यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने अर्जदारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला़.