शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नाशिकमधून हरवलेल्या ४ अल्पवयीन मुली पुण्यात सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 8:35 PM

या चौघीही नाशिक रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीत बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी ही रेल्वे सुटल्याने त्यांना खाली उतरता आले नाही...

ठळक मुद्देअपहरण झाल्याचा होता संशय; वडील रागावल्याने घरातून पलायन

पुणे : नाशिकमधून शुक्रवारी (दि. २३) रात्री आठच्या दरम्यान अपहरण झाल्याचा संशय असलेल्या १३ ते १५ वर्षांच्या ४ अल्पवयीन मुली स्वत:हून घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुली बंडगार्डन पोलिसांना शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेचारला पुणेरेल्वे स्थानकावर मिळाल्या. यातील एकजण वडिलांनी रागावल्याने घरातून निघून आली होती तर उर्वरित तिघी तिला समजण्यासाठी आल्या होत्या.          या चारही मुली सातवी-आठवीत शिकत आहेत. कोमल मूनचून सिंग (वय १३, रा. रोशनी अपार्टमेंट, जयभवानी रस्ता, नाशिक), तमन्ना श्रीचंद राजोलिया (वय १४, रा. गजानन हाईट्स, जयभवानी रस्ता, नाशिक), पलक अमोल आवारे (वय १४) व भूमी विजय गायकवाड (वय १५, दोघीही रा. हरिदर्शन सोसायटी, जयभवानी रस्ता, नाशिक) अशी घरातून बेपत्ता झालेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी कोमलची आई अनितादेवी मूनचून सिंग (वय ३६) यांनी शुक्रवारी मुलींचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनी या मुलींचे वर्णन, छायाचित्रे व मोबाईल क्रमांक इतर जिल्ह्यातील पोलिसांना पाठवले. तसेच या मुलींच्या मोबाईलवरून त्या शनिवारी दुपारी साडेतीनला पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल विभागाजवळ असल्याचे समजले. त्यामुळे नाशिक पोलिसांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांना कळवले. या पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकातील नाईक यास्मिन खान व सारिका सोनवणे यांनी शोध घेतला असता, या मुली त्याठिकाणी आढळल्या नाहीत. या मुलींचा शोध घेत असताना साडेचारच्या सुमारास त्यांचे 'मोबाईल फोन लोकेशन' फलाट क्रमांक चारवर दाखवण्यात येत होते. खान व सोनवणे यांनी त्याठिकाणी तपास केला असता या मुली तेथे आढळून आल्या. या मुलींना ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. कोमल सिंगला किरकोळ कारणावरून वडील रागावले होते. त्यामुळे ती घरातून निघून आली. तर उर्वरीत तिघी तिच्या मैत्रिणी आहेत. या तिघी कोमलला असे न करण्याबाबत समजावत होत्या. या चौघीही नाशिक रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीत बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी ही रेल्वे सुटल्याने त्यांना खाली उतरता आले नाही. या रेल्वेने त्या कल्याणला पोहचल्या. याठिकाणी उतरल्यावर त्यांनी पुण्याकडे येणारी रेल्वे पकडली. या गाडीने शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास त्या पुण्यात पोहचल्या. या मुलींना ताब्यात घेतले तेव्हा त्या खूप घाबरलेल्या, उपाशी व रात्रभर न झोपल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती, असे यास्मिन खान यांनी सांगितले. या मुली सापडल्याबाबत नाशिक पोलिस व त्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे