वेल्हे तालुक्यासाठी ४ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी दिली.
शिवतारे म्हणाले, सीएसआर फंडातून तालुक्यासाठी ४ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या आहेत. तसेच या बैठकीत लस उपलब्धता व स्थानिक नागरिकांचे लसीकरण, कोविड सेंटर, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रमधील सुविधा, अडचणी व त्रुटीबाबत आणि ऑक्सिजन सिलिंडर बाबत, सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयसाठी रुग्णवाहिका देण्याचे ठरविण्यात आले. या वेळी
प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सभापती दिनकर सरपाले, उपसभापती अनंता दारवटकर, पंचायत समिती सदस्य संगीता जेधे, डॉ. अंबादास देवकर, डॉ. परमेश्वर हीरास. माजी सरपंच संतोष मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, उपाध्यक्ष किरण राऊत, गेणबा देवगिरकर, संतोष मोरे, गोरक्ष भुरूक, विकास गायखे, राहुल ठाकर, अशोक सरपाले, संतोष रास्ते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.