शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Video: मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत ४ वाहने उडवली; संतप्त जमावाकडून त्या वाहनावर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:45 IST

१९ वर्षांच्या ऋतिकने सुस रोडवर मद्यधुंद अवस्थेत एका स्कुल बससहीत २, ३ वाहनांना धडक दिली

बाणेर: बाणेर येथील ननावरे उंडर पास सर्व्हिस रोडवर ड्रंक अँड ड्राइव्ह करत गुरुवारी ६.३०च्या सुमारास स्कूल बससह चार गाड्यांना ठोकले. संतप्त जमावाने पळून जाणाऱ्या वाहनावर दगडफेक केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाणेर पोलिसांनी या वाहनाला आणि वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.  त्याची मेडिकल टेस्टही करण्यात आली आहे.

ननावरे अंडर पास सर्व्हिस रोडवर चारचाकी चालक ऋतिक श्याम बनसोडे (वय १९, रा. रविशंकर ननावरे चौक, राहुल अर्कस, बिल्डिंग फ्लॅट) याने आपली चारचाकी स्कूल बसवर धडकवली आणि सरळ सूस पाषाण राेडकडे गेला. सुस रोडवर शिवशक्ती चौकात दुसऱ्या एका चारचाकीला धडक दिली. तसेच ननवरे चौकातील गॅरेजसमोरील गाड्यांना धडक देऊन गाड्यांचे नुकसान झाले. या गाडीचालकाने मद्य प्राशन केल्याचे निदर्शनास आले असून, बाणेर विभागातील ट्रॅफिक पोलिस निरीक्षक रजनी सरोदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. चालक ऋतिक श्याम बनसोडे (वय १९) यास बाणेर पोलिस स्टेशन येथे घेऊन जाऊन मेडिकलला पाठवले आहे. या अपघातात कोणीही जखमी नसून, पुढील तपास बाणेर पोलिस स्टेशन करीत आहे, अशी माहिती बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेBanerबाणेरAccidentअपघातPoliceपोलिसcarकारbikeबाईकCrime Newsगुन्हेगारी