बारामती: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी कोरोनाने प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि.२१) येथील चार शेती कामगारांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर या कामगारांच्या संपर्कातील ४० जणांचे स्वॅब घेण्यात आले असुन सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.या सर्वांवर बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार या चौघांची प्रकृती स्थिर आहे.त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.चौघाजणांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. चौघांच्या प्रत्येकी दहाजणांचे स्वॅब घेण्यात आल्याचे डॉ.खोमणे यांनी सांगितले.दरम्यान,आज शहर आणि तालुक्यात तपासणीसाठी घेतलेल्या १३८ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकूण ११८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.बारामती शहरातील ९ व ग्रामीण भागातील ८ असे सतरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तसेच इंदापूर तालुक्यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई येथील एक, तांदूळवाडी येथील एक, सूर्यनगरी येथील दोन, कसबा येथील एक, बारामती शहरातील २ , भिगवण रस्ता येथील एक व उपजिल्हा रुग्णालयातील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी असे नऊ जणांचा समावेश आहे .तसेच पंधरे येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपकार्तील एकाच कुटुंबातील सहा जण व काटेवाडी येथील २ असे ग्रामीण भागातील आठ असे एकूण १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये काल एकूण ४५ नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील ८ व ग्रामीण भागातील ५ असे १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट मधील एक, अशोक नगर मधील एक, सिद्धार्थ नगर हौसिंग सोसायटीमधील एक, अंबिका नगर मधील एक ,हरिकृपा नगर मधील एक, नक्षत्र गार्डन येथे एक, संगवीनगर येथील एक व तांदुळवाडी येथे एक असे आठ रुग्ण व करंजेपुल येथील एक माळेगाव येथील दोन, कोºहाळे बुद्रुक येथील एक व कांबळेश्वर येथील एक असे पाच व एकूण १३ एंटीजेन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.. त्यामुळे काल दिवसभरात एकूण ३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. बारामतीची रुग्ण संख्या ५०३ वर गेली आहे,अशी माहिती डॉ खोमणे यांनी दिली.——————————
'गोविंदबागे'तील कोरोना पॉझिटिव्ह ४ शेती कामगारांच्या संपर्कातले ४० जण क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 5:33 PM
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी शेती काम करणाऱ्या चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
ठळक मुद्देबारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु