निलेश विजय मारवाडी (रा धनगरवाडी ता. जुन्नर) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद पोलीस शिपाई शामसुंदर सुग्रीव जायभाये यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार , धनगरवाडी गावाचे हददीत निलेश विजय मारवाडी हा घरा समोर असणारे चिक्कुचे बागेच्या कडेला विहीरीच्या जवळच गावठी हातभटटी दारू तयार करत असुन त्याने तेथे गावठी हतभटटीची दारू तयार करण्यासाठीचे लागणारे कच्चे रसायन भिजत घातले आहे. त्याचे जवळ तयार गावठी हातभटटीची दारू असुन तो तिची बेकायदा बिगर परवाना त्याचे ओळखीचे लोकांना विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे नारायणगाव पोलिसांनी सायंकाळी ७ वा सुमारास छापा टाकला असता निलेश हा विहीरीच्या जवळच त्याचे समोर असलेल्या टिपाडामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी रापत असलेले रसायन काठीने ढवळीत असलेला पोलिसांना दिसला . निलेश याला पोलीस आल्याची चाहूल लागताच त्या ठिकाणावरून बाजुस असलेल्या उसामध्ये पळु गेला . पोलिसांना त्याठिकाणी ४० हजार किंमतीचे एकुण ४ हजार लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रापत असलेले रसायनआढळून आले. पोलिसांनी ते रसायन पंचनामा करून जागीच नष्ट केले आहे .