राज्यमंत्री दत्तात्रय
भरणे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
कळस : इंदापूर तालुक्यातील सात ठिकाणच्या रस्त्यांचे कामांसाठी ४१३ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कोरोना नंतरच्या काळात झालेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून राज्यमंत्री भरणे यांनी सदरचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून भिगवण-खानोटा ते बारामती रस्त्यासाठी २१७ कोटी ६८ लाख, भवानीनगर ते शेटफळगढे ते खडकी रस्त्यासाठी १७३ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण होणार असल्याने दळणवळण सुलभ होणार आहे आणि भवानीनगर ते खडकी रस्त्यामुळे इंदापूर व बारामती तालुक्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी पुणे-सोलापूर हायवेचे अंतर कमी होणार असल्याने नागरिकांचा वेळ वाचणार आहे व तसेच भिगवण-बारामती रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार असून, प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. याबरोबरच तालुक्यातील बोरी ते शेळगाव रस्त्यासाठी ६ कोटी, अंथुर्णे ते भरणेवाडी ते बिरंगुडवाडी रस्त्यासाठी ५ कोटी, कर्मयोगी साखर कारखाना ते निमगाव केतकी रस्त्यासाठी ३ कोटी, पुणे सोलापूर हायवे ते बाभूळगाव-भाटनिमगाव ते भांडगाव रस्त्यासाठी ३ कोटी व इंदापूर ते बेडशिंगे ते अवसरी ते भांडगाव रस्त्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रस्त्यासाठी वंचित असलेल्या खेडोपाड्यातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
----------------------------