सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात ७७ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७ रुग्णंचे अहवाल बाधित आले. सासवड शहर ९, ग्रामीण भागात सुपे २, पिंपळे १, टेकवडी २, चिव्हेवाडी १, सोनोरी १, सिंगापूर १, हिवरे १, वीर २, वाघापूर २, शिवरी १, दिवे १, अंबोडी १, जवळार्जून २ तर जेजुरी येथील ग्रामीण रुगणालयात ३१ संशयित रुग्णांची तपासणी केली असता १५ व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले. जेजूरी १, कोळविहिरे ३, भोसलेवाडी २, पिंपरे (खुर्द) ८, नावळी १ असे तालुक्यात एकूण ४२ व्यक्तीचे अहवाल बाधित आले आहेत.
नीरा नजीकच्या पिंपरे (खुर्द) येथील एकाच घरातील आठ व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने नीरा परिसरात खळबळ उडाली आहे. या कुटुंबात मागील आठवड्यात विवाह सोहळा झाला होता. या कुटुंबाच्या विवाहसोहळ्यात मोठ्या संख्येने मित्र परिवार सहभागी झाला असल्याने त्यांच्या तपासणी करणे आत गरजेचे झाले आहे.