शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

४२ कोटी लिटर पाणी एका पावसात मुरणार

By admin | Published: May 30, 2017 2:09 AM

‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४ लाख २० हजार घनमीटर एवढे प्रचंड जलसंधारणाचे

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४ लाख २० हजार घनमीटर एवढे प्रचंड जलसंधारणाचे काम झाले असून एका पावसात ४२ कोटी लिटर पाणी मुरणार आहे. यामुळे या ३३ गावांतील ग्रामस्थांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. यातून जलसंधारणाचे काम झालेच, शिवाय मन संधारणाचेही मोठे काम झाले आहे.या स्पर्धेसाठी पुरंदर व इंदापूर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली होती. पुरंदर तालुक्यातील सुमारे ३३ गावांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सिनेअभिनेते आमिर खान यांच्या या उदात्त संकल्पनेतून गाव पाणीदार करण्यासाठी गेल्या ८ एप्रिलपासून पुरंदर तालुक्यात शासनाला जे चार वर्षांत जमले नाही त्यापेक्षा मोठे काम उभे राहिले आहे. ग्रामस्थांचा लोकसहभागही दिसून आला. नुकतीच २२ मे रोजी ही स्पर्धा संपली. ३३ गावांनी सहभाग घेतला असला तरीही यातील साकुर्डे, पोखर, वाघापूर, आंबळे, मावडी क. प., चांबळी, पांगारे, हरणी, केतकावळे, बोऱ्हाळवाडी, मांढर या गावांनी रस दाखवला होता. स्पर्धेसाठी असणारी प्रश्नपत्रिका सोडवली आहे. यात लोकसहभागाबरोबरच मनुष्यबळ व यांत्रिक मशिनरीद्वारे कामे झाली आहेत. भारतीय जैन संघटनेने अनेक गावांना यंत्रासामग्री पुरवली होती. ग्रामस्थांची लोकवर्गणी तसेच काही सामाजिक संस्थांनी तसेच उद्योजकांनी आर्थिक मदतही केली होती. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी गावे दत्तक घेतली होती. मात्र त्यांच्याकडून ग्रामस्थांसोबत श्रमदानाव्यतिरिक्त एक रुपयाचीही मदत होऊ शकलेली नाही, उलट श्रमदानाचा फार्सच जास्त करून ग्रामस्थांना खर्चात पाडण्याचेच काम झाले आहे. ग्रामस्थांनी जिद्दीने व चिकाटीने गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फलित पाऊस पडल्यानंतरच दिसणार आहे.कोठे एकट्याची लढाई तर कुठे शेकडोंचा सहभागकाही गावांनी खूप मोठे काम केले तर काही गावातून शक्य होईल तेवढे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोठे एकट्याची लढाई तर कुठे शेकडो ग्रामस्थांचा सहभाग दिसत होता. यातून त्यांच्या जिद्दीचे दर्शन होत होते. दीड महिन्याच्या कालावधीत सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, अनगड दगडी बांध, पाझर तलाव, नालेदुरुस्ती, नांदेड टाईप शोष खड्डे, प्रतिमाणसी वृक्ष लागवडीसाठी खड्डे, बांधबंदिस्ती आदींसारखी कामे केली आहेत. यातून पावसाचे पाणी जिरवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे.गावाच्या शिवारातच हे पाणी राहणार सर्व गावातील अधिकृत नोंदीनुसार ४ लाख २० हजार घनमीटर एवढे काम झालेले आहे. पाऊस पडला तर सुमारे ४२ कोटी लिटर पाणी एका पावसात जमिनीत मुरणार आहे. तेवढा एका वेळी साठा होणार आहे. आता गावागावांतून पावसाची प्रतीक्षा सुरू झाली आहे, असे पाणी फाऊंडेशनचे पुरंदर तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी सांगितले.