लाेकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोटक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात तिन दिवसांत ४.२ टीएमसीने वाढ झाली आहे. प्रकल्पामध्ये आजमितीला एकुण ३७.१३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकरी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली.
जून महिन्यात पावसाने दडी दिल्याने धरणाच्या पाणलोटक्षेत्रात म्हणावा असा उपयुक्त पाणी आला नाही. ७ जुलै २०२१ रोजी धरणात केवळ १६.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सलग ३-४ दिवस सुरु असलेल्या पावसामुळे सर्व धरणामध्ये ३७.१३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी धरणात ६ हजार २८३.७९ (२१.१७ टक्के) द.श.घ.फुट पाणीसाठा शिल्लक होता. पावसामुळे नव्याने ४ हजार ७३४.५० द.श.घ.फुट पाणी साठ्यात वाढ झाली आहे. आजमितीला सर्व धरणांमध्ये ११ हजार ०१८.२९ द.श.घ.फुट (३७.१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणातून सध्या मिना नदीत ५२३ क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. पिंपळगाव जोगा धरणातून मृत साठा काढल्याने या धरणात १०० द.ल.घ.फुट पाणीसाठ्यात वाढ होऊन या धरणात एकूण वजा ७९८ द.ल.घ.फुट ( - २०.५२ टक्के ) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, अशी माहिती कार्यकरी अभियंता कडुसकर यांनी दिली.
कुकडी प्रकल्पातील पाच धरणांचा उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी व झालेला पाऊस
धरण उपयुक्त पाणीसाठा(द.ल.घ.फुट) टक्केवारी झालेला पाऊस (१ जुन पासून मिमिमध्ये)
येडगाव धरण १०२४.७५ २२६ मि.मी
माणिकडोह धरण २७६९ ५२.७२ ३८५ मि.मी.
वडज धरण ५५२ ४७.०५ २४३ मि.मी
पिंपळगाव जोगा - ७९८ - २०.५२ ३८० मि.मी.
डिंभा धरण ६६७२ ५३.४० टक्के ५२३ मि.मी