विशाल शिर्के ।पुणे : पावसाने ओढ दिल्याने येणारी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात गेल्या १२ वर्षांत ४२ हजार ४८२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशभरात १ लाख ७१ हजार ८०५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. देशात राज्यातील या आत्महत्यांचे प्रमाण २८ टक्के आहे.पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळविलेल्या माहितीतून हे विदारक वास्तव समोर आले आहे. २०१६चा शेतकरी आत्महत्यांचा अहवाल अद्याप प्रसिद्ध झाला नसल्याने, त्या वर्षाची आकडेवारी यात समाविष्ट नाही.देशांत महाराष्ट्रासारख्या प्रगत प्रदेशातच सातत्याने सर्वाधिक आत्महत्येची नोंद होत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकातील (१४ टक्के) आणि आंध्र प्रदेशातील (१२.३४ टक्के) शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, केरळसारखे १०० टक्के साक्षर राज्यदेखील या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेशात २४ हजार ७२ आणि कर्नाटकात २१ हजार २०१ आत्महत्यांची नोंद झाली आहे.मध्य प्रदेशात शेतकरी आत्महत्येचा आकडा १४ हजार ५३० इतका आहे. उत्तर प्रदेशात ६ हजार २१२, गुजरातेत ५ हजार ४०५, राजस्थान ५ हजार ९३, ओडिसात बावीसशे आणि बिहारमध्ये ७४६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. ईशान्येकडील राज्यांपैकी आसाममध्ये सर्वाधिक ३ हजार २०३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.>आत्महत्याग्रस्त राज्यांची आकडेवारीराज्य २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५महाराष्ट्र ३,३३७ ३,७८६ ३,१४६ २,५६८ ३०३०कर्नाटक २,१०० १,८७५ १,४०३ ३,२१ १,१९७आंध्र प्रदेश २,२०६ २,५७२ २,०१४ १६० ५१६मध्य प्रदेश १,३२६ १,१७२ १,०९० ८२६ ५८१
बारा वर्षांत ४२ हजार शेतक-यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 4:51 AM