शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

जिल्हा परिषदेच्या ४३0 शाळा ‘बोलक्या’

By admin | Published: April 29, 2015 11:03 PM

गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात सुरू केलेल्या आयएसओ मानांकन उपक्रमला ग्रामपंचायती, शाळा व अंगणवाड्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आजअखेर ७९५ संस्था आयएसओ करण्यात यश आले आहे.

पुणे : गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात सुरू केलेल्या आयएसओ मानांकन उपक्रमला ग्रामपंचायती, शाळा व अंगणवाड्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आजअखेर ७९५ संस्था आयएसओ करण्यात यश आले आहे. यात ४३0 शाळा या ‘बोलक्या’ झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. ८८१ संस्था या प्रोसेसमध्ये असून त्यांनाही लवकरच मानांकन मिळणार आहे.यात २0२ ग्रामपंचायती, १६३ आंगणवाड्या तसेच ४३0 शाळांचा समावेश आहे. आमची सेवा, गुणवत्ता व दर्जा हा आंतरराष्ट्रीय असला पाहिजे, हा ध्यास घेऊन कांतिलाल उमाप यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेने ‘आयएसओ’ ही संकल्पना जिल्ह्यात गेल्या वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषदेतील शाळांमधील घटती पटसंख्या हा एक चिंतेचा विषय होता. हे रोखणे हे प्रशासनासमोरचे मोठे अव्हान होते. यातून शाळा आयएसओ ही संकल्पना पुढे आली आणि शिक्षक दत्तात्रय वारे यांच्या प्रयत्नातून वाबळेवाडीच्या शाळेने आयएसओचा पहिला मान मिळविला. आजअखेर जिल्ह्यातील ३ हजार ७४८ शाळांपैकी ४३० शाळा या आयएसओ झाल्या आहेत. यात बारामती, दौंड, जुन्नर, शिरूर व आंबेगाव हे तालुके आघाडीवर आहेत.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर तालुका मात्र सर्वांत मागे असून, फक्त २ शाळा आयएसओ झाल्या आहेत. दौंड तालुक्यातील वरवंड केंद्राने सर्वांत आघाडी घेतली असून, १७ पैैकी १७ शाळा या आयएसओ केल्या आहेत. तसेच, त्यांच्या केंद्रप्रमुखांचे कार्यालयही आयएसओ झाले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले, की या उपकक्रमामुळे शाळांमधील भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेत आमूलाग्र बदल होत असून, मी माझ्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवणार, अशी पालकांची मानसिकता करण्यात आम्हाला यश येत आहे. पालकांनीही आता आग्रही न राहता मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवावे, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी) तालुका ग्रामपंचायती शाळा अंगणवाड्या एकूणआंबेगाव ४२४२ ४१ १२५बारामती ८६५१०८३ भोर ०२00२0दौंड ०६५१६६हवेली २२१७१४०इंदापूर ०२०२जुन्नर ५४६२७०१८६खेड १७४५८७०मावळ ६४६१६मुळशी १३२०२४५७पुरंदर ५३१०३६शिरूर ३५५०२८७वेल्हा ०७०७एकूण२०२४३०१६३७९५आयएसओ ही एक चळवळ असून, जिल्हा परिषदेतील पहिलीच्या मुलाला १०० पर्यंत उजळणी, १० पर्यंत पाढे व घडाघडा वाचता आलेच पाहिजे. याचबरोबर, अंगणवाड्यांप्रमाणे बोलक्या शाळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - कांतिलाल उमापमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदआयएसओमुळे शाळा ‘अटडेट’ झाली आहे. रेकॉर्ड अद्ययावत झाले असून गुणवत्ता वाढली आहे. शाळेतील भौतिक सुविधांमध्येही वाढ झाली असून शिक्षकांना काम करताना आनंद वाटत आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे उपक्रम राबविले जात असून आनंददायी शिक्षण आता मिळत आहे. यात पालकांचा चांगला सहभाग मिळत आहे.- दत्तात्रय कंकशिक्षक, आयएसओ शाळा शिंद(भोर)