मंचर/अवसरी : दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सरासरी प्रतिदिन ४३६७ टनाप्रमाणे गाळप करून जास्तीतजास्त साखर उतारा मिळवला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ४ कोटी १० लाख ७६ हजार ३६० युनिट वीज वीज वितरण कंपनीस निर्यात केली असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी कारखान्याच्या गाळप हंगामाच्या सांगता कार्यक्रमात दिली.याप्रसंगी हंगामात जास्तीतजास्त ऊसवाहतूक करणारे ट्रक, टॅ्रक्टर, बैलगाडी व ऊसतोडणी कंत्राटदारांचा बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, ज्ञानेश्वर अस्वारे, चंद्रकांत ढगे, केन मॅनेजर सदाशिव बर्गे, शेतकरी, अधिकारी अंकु श आढाव तसेच कारखाना अधिकारी, कर्मचारी, ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार, ऊसतोडणी मजूर उपस्थित होते.चालू गाळप हंगामात जास्तीतजास्त ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी संतोेष चकोर २७५० टन, ट्रॅक्टरसाठी कुंडलिक मारुती थोरात ३५०९ टन, ट्रॅक्टरजोड टायरगाडी बापू हरिभाऊ फरतारे ११११ टन, टायर बैलगाडीसाठी भाऊसाहेब त्रिंबक बेदरे ४५९ टन तसेच जास्तीतजास्त ऊसतोडणीसाठी कंत्राटदार काशीनाथ गरदाल जाधव ३५०९ टन यांचा रोख रक्कम व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊसउत्पादक, ऊसतोड, वाहतूक कंत्राटदार, ऊसतोड मजूर, कारखाना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने बाळासाहेब बेंडे यांनी आभार मानले. सन २०१५-१६ हंगामात कार्यक्षेत्र परिसर व गेटकेन विभागातून ७,६५,०७९ टन उसाचे गाळप केले असून, १६० टक्के कार्यक्षमतेचा वापर करून ११.६६ टक्के साखर उताऱ्याने ८,९३,४१० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी प्रतिदिन ४३६७ टनाप्रमाणे गाळप करून जास्तीतजास्त साखर उतारा मिळवला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पापासून कारखाना वापर वजा जाता ४ कोटी १० लाख ७६ हजार ३६० युनिट वीज वितरण कंपनीस निर्यात केली असल्याची माहिती बेंडे यांनी दिली.
‘भीमाशंकर’चे प्रतिदिन ४३६७ टन गाळप
By admin | Published: May 09, 2016 12:41 AM