पुणे : जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाने ९ मार्चपासून पुणेकरांची झोप उडवली़ दिवसांगणिक रूग्ण संख्या वाढत गेली. सुरवातीच्या टप्प्यात ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या तसेच अन्य कारणांमुळे गंभीर रुग्णांची संख्या मोठी होती. महापालिकेच्या ३० कोविड सेंटरमधून आजवर ४४ हजार ४२ कोरोनाबाधित कोरोनावर मात करुन सुखरुप घरी गेले. नऊ महिन्यानंतर या चारही केंद्रांमध्ये केवळ १४९ रूग्ण आहेत़
* १८ हजार खाटांची उपलब्धता
महापालिकेने ३० कोविड केअर केंद्रांमध्ये संशयित व कोविड रूग्णांच्या १४ दिवसांच्या विलगीकरणासाठी सुमारे १ लाख ४०० खाटा तयार ठेवल्या. तर गंभीर रुग्णांसाठी ७ हजार ४६६ खाटा नव्याने उपलब्ध करून देण्यात आल्या़ यात १ हजार ५५ आय़सीयू खाटा आणि ५२१ व्हेंटिलेटरची उपलब्धता करण्यात आली़ याप्रकारे कोरोना रूग्णांसाठी शहरात १८ हजार खाटा उपलब्ध झाल्या.
* १ लाख ७२ हजार कोरोनाबाधितांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’
कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यावर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्गाचा धोका होता. यासाठी १ लाख ७२ हजार २८ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यात आल्या. या ५ लाख ९० हजार ४४२ ‘अतिधोकादायक’ आणि व १७ लाख ३४ हजार ८९८ धोकादायक संभाव्य कोरोना रुग्णांची काळजी महापालिकेने घेतली.
----------------------